Ad will apear here
Next
पुन्हा रंगणार महाभारत
पुणे : भारतीय वाङ्मय ज्या ग्रंथाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील तो ग्रंथ म्हणजे महाभारत. फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक साहित्यकृतींमध्ये महाभारताचे स्वतःचे असे स्थान आहे. भारतीय शिकवण आणि तत्त्वज्ञान यांचा कथारूप मिलाफ म्हणजे महाभारत. परंतु, आजही कित्येकांना महाभारताची संपूर्ण ओळख नाही. ती करून देण्यासाठी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने ‘महाभारत व्याख्यानमाला’ हा उपक्रम सुरू केला आहे. महाभारताच्या अभ्यासक लीला मेहेंदळे पुणेकरांना समग्र महाभारताचे दर्शन घडवणार आहेत. दर बुधवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत भांडारकर संस्थेत ही व्याख्याने होतील. 

लीला मेहेंदळे भगवद्गीता आणि महाभारताच्या अभ्यासक म्हणून आहेत. त्यांनी वडील डॉ. बलराम अग्निहोत्री यांच्याकडे संस्कृत व तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला आहे.‘महाभारतातील भारतीय तत्त्वज्ञान’ या विषयावर भांडारकर संस्थेमध्ये त्यांचे अध्ययन सुरू आहे. व्याख्यानमालेत कथाकथनाच्या माध्यमातून मेहेंदळे महाभारतातील बारकावे सांगणार आहेत. सध्याच्या तरुणांना देशाच्या एका महान ग्रंथाचे पैलू कळावेत या उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

भारतीय कुटुंबांतील मुलांचे बालपण क्वचितच महाभारताशिवाय जाते. अनेक पिढ्या मौखिक परंपरेने चालत आले असल्याने महाभारत त्याच्या मूळ संहितेपासून बरेच दूर आले आहे. काळानुरूप ज्येष्ठ नागरिक, प्रौढ नागरिक, तरुण, किशोर आणि शाळकरी मुले असे वर्गीकरण केले, तर सध्याच्या या चारही पिढ्यांमध्ये महाभारताबद्दलची अर्धवट माहिती आहे. अशा लोकांना महाभारताची खरी ओळख करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KYUGBA
Similar Posts
अद्भुत स्वर्गारोहिणीच्या सफरीचा माहितीपट पुणे : हिमालयाच्या कुशीत अत्यंत रमणीय, निसर्गरम्य प्रदेशात पौराणिक वारसा असलेली अनेक पवित्र तीर्थस्थळे आहेत. असेच एक ठिकाण आहे स्वर्गारोहिणी. येथूनच पांडव स्वर्गात गेले असे म्हणतात. हे ठिकाण उत्तराखंड राज्यातील बद्रिनाथ या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातील कर्दळीवन सेवा संघाने
एकविसावे बंधुता साहित्य संमेलन २१ डिसेंबरला पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २१ आणि २२ डिसेंबरला भोसरी येथे होणार आहे.
साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज पुणे : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली ११० वर्षे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या या संस्थेचा १११वा वर्धापनदिन २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ग्रंथ आणि
संस्कृत भाषेच्या उन्नतीसाठी झटणारी पुण्यातील आनंदाश्रम संस्था उच्च न्यायालयात वकिली करणारे महादेव चिमणाजी आपटे यांनी ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मित:’ हे ध्येय समोर ठेवून पुण्यात १८८८मध्ये ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था संस्कृतची उन्नती, प्रसार यांसाठी कार्यरत आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत या संस्थेबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language